Marathi News Photo gallery Not a cobra, this is the most poisonous snake found in Maharashtra death rate is also high dont make a mistake in identifying it
नाग नाही तर हा आहे महाराष्ट्रात आढळणार सर्वात विषारी साप, मृत्यूचं प्रमाणही अधिक, ओळखण्यात चूक करू नका!
महाराष्ट्रात सापाच्या प्रमुख्यानं चारच विषारी जाती आढळतात, त्यामधे नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस या जातींच्या सापाचा समावेश होतो, आज आपण यातीलच एका जातीबद्दला सविस्तर माहिती घेणार आहोत.
1 / 7
साप म्हटलं की अंगावर भीतीनं काटा उभा राहातो. साप नुसता पाहिला तरी देखील अनेकांना भीती वाटते.अनेकदा आपल्या घरात, आजुबाजूला परिसरात जेव्हा साप आढळतो, तेव्हा आपण त्याला विषारी समजून मारण्याची चूक करतो.
2 / 7
प्रत्येक साप हा विषारीच असतो असा अनेकांचा गैरसमज आहे. या गैरसमजातून अनेक बिनविषारी साप देखील मारले जातात. खरं पहाता साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, तो उंदिर खाऊन शेतकऱ्यांची मदत करतो.
3 / 7
महाराष्ट्रात शेकडो सापांच्या प्रजाती आढळतात त्यांतील असंख्या जाती या बिनविषारी आहेत. महाराष्ट्रात आढळणाऱ्या फक्त चारच जाती या विषारी आहेत. त्यामध्ये कोब्रा अर्थात नाग, घोणस, फुरसे आणि मण्यार या सापांचा समावेश होतो.
4 / 7
आज आपण ज्या सापाची माहिती घेणार आहोत, तो विषारी प्रजातीमध्ये मोडणारा साप आहे. या सर्पाच्या दंशामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण हे नागाच्या दंशामुळे होणाऱ्या मृत्यूच्या तुलनेत देखील अधिक आहे.
5 / 7
आज आपण घोणस या सापाबद्दल माहिती घेणार आहोत. घोणस हा महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारा अतिशय विषारी असा साप आहे. हा साप काहीसा अजगरासारखा दिसतो. त्यामुळे अनेकजण याला अजगर म्हणून पकडायला जातात आणि दंशाचं प्रमाण वाढतं.
6 / 7
नागाच्या तुलनेमध्ये हा साप दंश करण्याचं प्रमाण हे जास्त असतं कारण हा साप नागापेक्षा अधिक आक्रमक असतो. या सापाला ग्रामीण भागात परड देखील म्हणतात.
7 / 7
हा साप ओळखण्याचा सोपा मार्ग म्हणजे या सापाला धोका जाणवल्यानंतर कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करतो. तसेच त्याच्या सर्व अंगावर एका विशिष्ट अकाराची माळ असते. त्याचे तोंड समोरून निमुळते त्रिकोणी असते.