Numerology : शनिवार 15 एप्रिल 2023 रोजी कसं असेल अंकशास्त्र, जाणून घ्या लकी नंबर आणि शुभ रंग
Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुम्ही तुमचा शनिवार 15 एप्रिल हा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. 14 एप्रिल 2023 या तारखेचा मूलांक 5 हा आहे. तर भाग्यांक 1+5+0+4+2+0+2+3 = 8 हा भाग्यांक असणार आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 15 ही जन्मतारीख असेल तर 1+5 असं करत मुलांक 6 येईल.
2 / 10
तुम्हाला आज कामात यश मिळेल. मित्रांकडून चांगली मदत होईल. त्याचबरोबर आर्थिक कोंडी सुटेल. त्यामुळे डोक्यावरील भार हलका होईल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.
3 / 10
तुमच्या कुटुंबावर अचानक काही संकट ओढावेल. पण घाबरून जाऊ नका. धीराने सामना करा. लांबचा प्रवास करणं शक्यतो टाळा. घरीच शांतपणे आराम करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
4 / 10
गेल्या काही दिवसांपासून अडकलेलं काम आज पूर्ण कराल. त्यामुळे आत्मविश्वास दुणावेल. केलेल्या कामाचं चीज झाल्याने बॉसही खूश होईल. त्यामुळे तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
अंकशास्त्राचं गणित त्यात पंचक लागत असल्याने तर सांभाळूनच राहा. घरात फर्निचर करायचं असेल तर पाच दिवस थांबा. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
जुन्या मित्र मैत्रिणींची अचानक गाठभेट होईल. त्यामुळे जुन्या काही गोष्टींना उजाळा मिळेल. एकदम भुतकाळात नेणारा हा दिवस राहील. कामाच्या ठिकाणी आनंदी वातावरण राहील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी असेल.
7 / 10
प्रत्येक आपल्या मनासारखी होईलच असं नाही. त्यामुळे चीडचीड करण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा डोकं शांत ठेवून येणारं काम कसं योग्य करता येईल यावर लक्ष केंद्रीत करा. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.
8 / 10
एखाद्या आर्थिक व्यवहारात तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे जरा काळजीपूर्वक व्यवहार करा. डोळे बंद ठेवून विश्वास ठेवू नका. पुढचा विचार करून सावध पावलं उचला. शुभ अंक 18 आणि शुभ रंग करडा राहील.
9 / 10
सकारात्मक विचारांनी सुरुवात केली की दिवस चांगला जातो. त्यामुळे चिंता बाजूला ठेवून कामावर लक्ष केंद्रीत करा. घरातील काही वाद दूर ठेवा आणि सल्लामसलत करा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
दूरच्या नातेवाईकांकडून विनाकारण वाद केला जाईल. त्यापेक्षा शांत राहून कायद्याने विचार करा. घरातील काही कामांकडे लक्ष द्या. जोडीदाराला त्रास होईल असं वागू नका. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)