तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना आज प्रत्यक्ष महादेवांच्या दर्शनाचा आनंद मिळाला.
कोरोना काळात बंद असलेलं मंदिर, यंदाच्या महाशिवरात्रीला भाविकांसाठी खुले झाल्याने ,त्रंबकेश्वर मध्ये देशभरातून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे.
मंदिराच्या बाहेर तीन ते चार किलोमीटर पर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या असून, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आलेली आहे.
महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासूनच मंदिरात विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आला असून, भाविकांच्या व्यवस्थेसाठी त्रंबकेश्वर प्रशासन सज्ज झाला आहे.
आज महाशिवरात्री निमित्त मंदिरात विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामुळं परिसरात अधिक भाविक जमतील अशी शक्यता आहे.
महाशिवरात्री निमित्त संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून तिथल्या परिसरात भाविकांचा उत्साह पाहायला मिळत आहे.