भारतात Oneplus 11 5 जी फोनची किंमत तुलनेने जास्त आहे. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना हा स्मार्टफोन विकत घेता येत नाही. पण सध्या फ्लिपकार्ट ई कॉमर्स वेबसाईटवर मोठी सूट मिळत आहे. (Photo- Oneplus)
तुम्ही स्वस्तात नवीन प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही Oneplus 11 5G च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट वर 20,000 रुपयांची बचत करू शकता. (Photo- Oneplus)
Oneplus 11 5 जी स्मार्टफोनची मूळ किंमत 56,999 रुपये आहे. मात्र, ई-कॉमर्स वेबसाइटवर या स्मार्टफोनची किंमत 55,399 रुपये ठेवण्यात आली आहे. पण काही ऑफर्सद्वारे तुम्ही हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. (Photo- Oneplus)
तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून Oneplus 11 5G खरेदी केल्यास 19,800 रुपयांपर्यंत बचत करू शकता. पण जुना फोन चांगल्या स्थितीत असणे आवश्यक आहे. तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास तुम्ही Oneplus 11 5G स्वस्तात खरेदी करू शकता. (Photo- Oneplus)
Oneplus 11 5G ला 50-मेगापिक्सेलच्या प्रायमरी कॅमेरासह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. 48-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 32-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. (Photo- Oneplus)
मोबाइल फोनमध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात 100 W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी देखील आहे. हा स्मार्टफोन चांगला पद्धतीने परफॉर्म करावा यासाठी क्वालकॉमच्या अपडेटेड व्हर्जन स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 चिपसेटद्वारे समर्थित आहे. स्क्रीन संरक्षणासाठी मोबाईल फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टससह येतो. (Photo- Oneplus)