भारतातील असं एकमेव गाव जिथे भरते सापांची अदालत; स्वत: नागराजा करतात न्यायनिवाडा, काय आहे प्रथा?
भारतीय संस्कृतीमध्ये सापाला विशेष: नागाला देवाचं रूप मानलं गेलं आहे. नाग पंचमीच्या दिवशी आणि काही ठिकाणी इतरही दिवशी नागांची पूजा करण्याची प्रथा आहे. काही गाव तर सापांबाबत असलेल्या त्यांच्या अनोख्या प्रथांबद्दल देशभरात प्रसिद्ध आहेत.
1 / 7
भारतीय संस्कृतीमध्ये सापला विशेष: नागाला देवाचं रूप मानलं गेलं आहे.नाग पंचमीच्या दिवशी आणि काही ठिकाणी इतरही दिवशी नागांची पूजा करण्याची प्रथा आहे. काही गाव तर सापांबाबत असलेल्या त्यांच्या अनोख्या प्रथांबद्दल देशभरात प्रसिद्ध आहेत. सापाला शेतकऱ्यांचा मित्र मानलं जातं.
2 / 7
सोलापूर जिल्ह्यात असंच एक गाव आहे, जे गाव सापांमुळे राज्यभरात प्रसिद्ध झालं आहे. शेतफळ असं या गावाचं नाव आहे. ज्याप्रमाणे आपण पाळीव प्राणी पाळतो त्याचप्रमाणे येथील लोक सापं पाळतात. त्यांच्या निवासाची देखील खास सोय असते. येथील मुले शाळेत देखील साप घेऊन जातात.
3 / 7
असंच महाराष्ट्रात आणखी एक गाव आहे, ज्याचं नाव बत्तीस सिराळा आहे. या गावात नाग पंचमीला जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा होती. मात्र काही वर्षांपूर्वी या प्रथेवर बंदी घालण्यात आली. हे गाव देखील राज्यभरात प्रसिद्ध होतं.
4 / 7
या दोन गावांप्रमाणे भारतात अशी अनेक गावं आहेत, जी गावं आपल्या अनोख्या प्रथा पंरपरेमुळे देशभरात प्रसिद्ध झाले आहेत. भारतात तर असं एक गाव आहे, ज्या गावात चक्क सापांची अदालत भरते. या अदालतीमध्ये नागराजा न्यायनिवाडा करतात.
5 / 7
या गावाचं नाव लसूडिया असून हे गाव मध्य प्रदेशातील सिहौर जिल्ह्यात येते. या गावात सापांची अदालत भरते जाणून घेऊयात नेमकी काय आहे ही प्रथा?
6 / 7
या गावात दर वर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी ही अदालत भरते. या प्रथेला शंभर वर्षांची परंपरा असल्याचा दावा येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो. स्थानिकांनी केलेल्या दाव्यानुसार या गावात एका व्यक्तीच्या अंगात नाग देव येतात. त्या वर्षात ज्या व्यक्तीला साप चावला असेल त्या व्यक्तीला तिथे आणलं जातं, त्या व्यक्तीला संर्पदंश कशामुळे झाला याचं कारण हा व्यक्ती सांगतो.
7 / 7
रम्यान ज्या व्यक्तीला साप चावला आहे, अशा व्यक्तीचा मोफत उपचार देखील इथे केला जातो, असा दावा येथील ग्रामस्थांकडून करण्यात येतो. यावेळी नागराजाची आरती म्हणून पूजा देखील केली जाते. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही, सर्पदंश झाल्यास योग्य डॉक्टरकडे जाऊनच त्यावर उपचार करावा असा सल्ला देण्यात येत आहे)