टेलिव्हिजनमध्ये अनेक कलाकारांना सावळ्या रंगामुळे भेदभावाला सामोरे जावं लागतं. अनेक चांगल्या कलाकारांना वर्णभेदाचा सामना करावा लागतो. काही कलाकारांनी हे सहन केलं तर काहींनी याविरोधात वाचा फोडली आहे.
नैना सिंह - 'बिग बॉस 14' मध्ये झळकलेली अभिनेत्री नैना सिंहनं याविरोधात वाचा फोडली. 'माझी त्वचा सावळी आहे. माझ्या चेहऱ्याच्या सावळ्या रंगामुळे मला बर्याच वेळा नाकारलं गेलं आहे. इन्डस्ट्रीमध्ये नेहमीच गोऱ्या रंगाच्या मुलींना संधी दिली जाते.' असं तिनं सांगितलं. तेलगु चित्रपटाच्या ऑडिशनला गेले होते. त्यावेळी ' सगळं ठिक आहे, मात्र जा आणि ट्यूबलाइट खा, गोरी होशील' असं मला सांगण्यात आलं, असा धक्कादायक प्रसंगही तिने सांगितला.
राजश्री ठाकूर- 'शादी मुबारक' मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री राजश्री ठाकूरनं आता हा शो सोडला आहे. तिच्या मतानुसार 'लोक नेहमीच सौंदर्यासोबत विशेषणे का जोडतात?. 'सौंदर्य' म्हणजे सौंदर्य असतं. त्याला 'डस्की' हा शब्द का जोडला गेला आहे. सौंदर्याला विशेषण जोडून फरक करू नये. '
सुचित्रा पिल्लई- 'मला 'गोड आणि सुंदर' ऐवजी सावळी किंवा डस्की म्हणणे पसंत आहे,' असं मॉडेल आणि अभिनेत्री सुचित्रा पिल्लईने म्हटलं आहे.
निया शर्मा - मला “डस्की किंवा ब्राऊन” म्हणतील याची मला पर्वा नाही, असं अभिनेत्री निया शर्मा म्हणाली.
.उल्का गुप्ता - उल्का गुप्तानं खुलासा केलाय की तिच्या सावळ्या रंगामुळे तिला 'सात फेरे'मध्ये सावित्री ही भूमिका मिळाली आणि तिला या गोष्टीचा गर्व आहे.