आयफोन 14 खरेदी करायचा असेल मोठी सवलत एका वेबसाईटनं दिली आहे. दुसरीकडे अॅपल अथोराइज्ड स्टोअर युनिकॉर्नवर अॅप्पल आयफोन 14 मॉडेलवर मोठी सूट दिली जात आहे. (Photo- Apple)
iPhone 14 128GB Price in India: Apple ब्रँडच्या 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 79 हजार 900 रुपये असली तरी युनिकॉर्नच्या ऑनलाइन साइटवरील सर्व ऑफर्सचा फायदा घेतल्यानंतर तुम्ही हे मॉडेल केवळ 34 हजारांमध्ये खरेदी करू शकाल. (Photo- Apple)
iPhone 14 Offers: iPhone 14 च्या 128 GB वेरिएंटवर 10 हजारांची झटपट सूट दिली जात आहे, त्यानंतर हे मॉडेल 69,900 रुपयांना विकले जात आहे. याशिवाय HDFC बँकेच्या कार्डने बिल भरल्यास 4 हजारांची सूटही मिळणार आहे. (फोटो- Unicorn स्टोर)
जुना फोन एक्सचेंज करण्यावर 25,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे, याशिवाय 6,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट बोनस देखील दिला जात आहे. या सर्व बँक सवलती आणि ऑफरचा लाभ घेतल्यानंतर, तुम्हाला iPhone 14 128GB मॉडेल 34,000 रुपयांमध्ये मिळेल. (Photo- Apple)
iPhone 14 Specifications: iPhone 14 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले पॅनल आहे. तसेच या यात A15 बायोनिक चिपसेट आहे. फोनच्या मागील पॅनलवर 12 मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. (Photo- Apple)