Ajit Pawar: एकीकडे ते फोडाफोडी करत होते, आणि…; फडणवीसांवर निशाणा साधत अमृता फडणवीसांचा अजितदादांनी ‘तो’ संदर्भ सांगत टोलेबाजी
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस गटावर टीका करताना म्हणाले की, राज्यात सत्तांतर होण्यापूर्वी जो घटनाक्रम झाल्यानंतर जी परिस्थिती दिसून येते, त्यावरून असे दिसते की, कुठंतरी पाणी मुरत आहे आणि नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे हे त्रिवार सत्य आहे
1 / 10
देवेंद्र फडणवीस यांच्या वेषांतरावर त्यांची पत्नीने सांगितलेल्या किस्स्यावरही अजित पवार यांनी टोलेबाजी करत म्हणाले, एकीकडे ते फोडाफोडी करत होते, तर दुसरीकडे आमचा काही संबंध नसल्याचा दावा करत होते. अशी परिस्थिती चालू असतानाच देवेंद्र फडणवीस वेष बदलून घराबाहेर जात होते त्यांच्या पत्नीनेच उघड केले असेही अजित पवार यांनी सांगितले.
2 / 10
ज्या पध्दतीने उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून घालवले. राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे राजकारण फार काळ टिकणारे नसल्याचा दावा अजित पवार यांनी केला.
3 / 10
अजित पवार यांनी सत्तेतून पायउतार झाल्यानंतर सत्ता येत असते, जात असते. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेला नाही. जनता काय तो निर्णय घेत असते असा इशारा त्यांनी शिंदे-फडणवीसांना दिला आहे.
4 / 10
पक्षांतर बंदी कायद्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत असे यापूर्वी महाराष्ट्रात आणि देशातही घडले नव्हते. त्यामुळे यांच्याकडून लोकशाहीची थट्टा चालू झाली आहे.
5 / 10
शिंदे-फडणवीस सरकार येऊन पंधरा दिवस होऊन गेल्यावरही मंत्री मंडळाचा विस्तार झाला नसल्याने अजित पवार यांनी टीका करत त्यांनी शिंदे-फडणवीस यांच्याकडून राज्यात सध्या काहीही प्रकार चालू आहेत, त्यामुळे लोकशाहीची थट्टा सुरू आहे, लोकशाहीचा खून केला जात असल्याची बोचरी टीकाही अजित पवारांनी केली.
6 / 10
बंडखोर आमदारांविषयी बोलताना त्यांनी मागील बंडखोर आमदारांचा इतिहास सांगत म्हणाले की, पक्षांतर केलेले नेते जनतेला आवडत नाही. पुढच्या वेळी मतदार त्यांना नाकारतात, हे यापूर्वी अनेकदा दिसून आलेले आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
7 / 10
आधी सरकारला धारेवर धरलं, आता अजित पवार अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करणार, ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी
8 / 10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माईक ओढून घेतले होते, त्यावर अजित पवार यांनी आपल्या स्टाईलने टीका करत म्हणाले की, आताच माईक ओढून घेणं वगैरे चालू झालं आहे, कागदावर लिहून मुख्यमंत्र्यांना काय बोलायचं काय नाही हेपण उपमुख्यमंत्र्यांकडून सांगितलं जात असल्याची टीका शिंदे-फडणवीस सरकावर केली.
9 / 10
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस गटावर टीका करताना म्हणाले की, राज्यात सत्तांतर होण्यापूर्वी जो घटनाक्रम झाल्यानंतर जी परिस्थिती दिसून येते, त्यावरून असे दिसते की, कुठंतरी पाणी मुरत आहे आणि नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे हे त्रिवार सत्य आहे अशी सूचक टिप्पणी खेड येथे बोलताना केली.
10 / 10
शिंदे-फडणवीस यांचा शपथविधी होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी अजूनही मंत्री मंडळ स्थापन झाले नसल्याने विरोधकांकडून जोरदार हल्ला करण्यात येत आहे. यावेळी
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील सत्ता नाट्यातील अनेक गोष्टींचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.