सातारा : निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. संपूर्ण हंगामात अवकाळीचे संकट हे सुरुच होते. त्यामुळे उत्पादनात तर घट झाली आहेच शिवाय शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे.हंगाम अंतिम टप्प्यात अन् द्राक्ष तोड सुरु असतानाच जिल्ह्यातील माण तालुक्यात मागील दोन दिवसात अवकाळीची अवकृपा ही सुरु आहे. मात्र, वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा ह्या भुईसपाट झाल्या आहेत. चक्रीवादळाच्या तडाख्यात पळसावडे येथील द्राक्ष बागायतदार कुंडलिक यादव यांची पावणे दोन एकर द्राक्ष बाग आडवी झाली आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यातही अवकाळीची अवकृपा ही सुरुच आहे. आता न भरुन निघणारे नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.