एकीकडे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पालघर पोलीस दलाला नवनवीन वाहने मिळत आहेत. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी आणि दानशूर यांनी दिलेल्या पेट्रोलिंग बाइक्स गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या आहेत.
लाखो रुपये खर्च करून जनतेच्या सेवेसाठी दिलेल्या या बुलेट पेट्रोलिंग बाईक्स बिएस 6 प्रणालीच्या नसल्याने त्यांना परिवहन विभागाची परवानगी नाही. म्हणून त्या तशाच पडून असून मरणावस्थेला टेकल्या आहेत.
आता या बाईकची दुरावस्था झाली असून इंजिनसह टायर व इतर पार्ट पूर्णपणे गंजलेले आहेत. त्यामुळे या बाईक्स भंगारात टाकण्याच्या लायकीच्या बनल्या आहेत.
या पेट्रोलिंग बाईक्स ग्रामीण भागासाठी वरदान ठरल्या असत्या. मात्र सरकारी लाल भीती कारभारात त्या अडकल्या आहेत.
बीएस 6 ही प्रणाली सुरू असताना त्यावेळी बीएस ४ व ५ ही प्रणाली असलेल्या या बाईक्स जिल्हा पोलिसांनी का स्वीकारल्या, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
पोलीस प्रशासनासह आरटीओ विभागाच्या हलगर्जीपणामुळे जनतेच्या सेवेसाठी लाखो रुपये खर्च करुन घेतलेल्या या बाईक्स भंगार अवस्थेत पडल्या आहेत. त्यामुळे या पैशांचा चुराडा झाल्याचे एकंदरीत दिसून येते.
पालघरच्या जुन्या पोलीस अधीक्षक कार्यालयात बाईक्स धूळ खात भंगारवस्थेत पडून आहेत.
या ठिकाणी साधारण १४ बाईक्स चार वर्षांपासून पडलेल्या अवस्थेत आहेत. या बाईक्सचे टायर, इंजिन आणि इतर पार्टस दुरावस्थेत आहेत