शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भांडणारा नेता आणि जमिनीशी नाळ ठेवून काम करणारा नेता म्हणून ओळख असलेले पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं अखेर निधन झालं.
Ad
वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी पुण्याच्या रुबी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
Follow us on

भारत भालके यांना 30 ऑक्टोबर 2020 रोजी कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं होतं. उपचारानंतर चार दिवसात त्यांनी कोरोनावर मातही केली होती. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
मात्र, दिनांक 26 नोव्हेंबरपासून त्यांची प्रकृती आणखीनच खालावली. त्यांना किडनी आणि मधुमेहाचा आजार असल्याने ते उपचारास प्रतिसाद देत नव्हते.
पंढरपूर येथील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. ते स्वत:ही पेशाने शेतकरी होते. दहावीपर्यंत शिकलेल्या भालके यांनी राजकारणात मात्र चांगला जम बसवला होता.
भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते.
देशासह राज्यात भाजपची लाट असल्याने 2019च्या निवडणुकीत ते काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणार होते. पण ऐनवेळी त्यांनी निर्णय बदलून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि विजयाची हॅट्रीकही साधली.
भालके हे त्यांच्या सेवाभावी कामांमुळे जनसामान्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते.
या वर्षी पंढरपुरात महापूर आल्यावर भालके यांनी पूरग्रस्त भागांची अनोख्या पद्धतीने पाहणी केली होती. पुरातून स्वत: होडी चालवून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला होता.