PHOTO : पंढरपुरात ‘महाशिवरात्रीचा’ उत्साह, दोन टन शेवंतीची फूल आणि बेलपत्रांनी मंदिर सजलं

| Updated on: Mar 11, 2021 | 3:23 PM

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला ‘महाशिवरात्री’ साजरी केली जाते. (Pandharpur Vitthal-Rukmini Temple)

1 / 8
आज 11 मार्च महाशिवरात्रीचा मोठा सण. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला ‘महाशिवरात्री’ साजरी केली जाते.

2 / 8
महाशिवरात्रीनिमित्त पंढरपुरातील श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर शेवंतीच्या फूल आणि बेलपत्रांनी सजवले होते.

3 / 8
विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील ही सजावट करण्यासाठी जवळपास दोन टन पाना-फुलांचा वापर करण्यात आला होता.

4 / 8
मंदिरातील देवाचा गाभारा, सोळखांबी, चारखांबि, तसेच रुक्मिणीमातेचा गाभारा पांढऱ्या शेवंतीच्या फुलांनी सजवण्यात आला होता.

5 / 8
विशेष म्हणजे महाशिवरात्रीच्या निमित्त विठ्ठलाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्यात आले होते.

6 / 8
तर रुक्मिणीमातेला पिस्ता रंगाची साडी परिधान करण्यात आली होते.

7 / 8
त्यामुळे सावळ्या विठुराया आणि रुक्मिणीमातेचे रुपडं अधिकच खुलून दिसत होते.

8 / 8
विशेष म्हणजे आज महाशिवरात्र असल्याने या सजावटीमध्ये बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमेचा देखील कल्पतेने वापर केला आहे.