झी मराठी वाहिनीवर 'वेध भविष्याचा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्योतिषाचार्य भगरे गुरुजी दैनंदिन राशीभविष्य सांगतात. या कार्यक्रमातून भगरे गुरुजी आरोग्यमंत्र, पौराणिक कथा, वास्तूशास्त्र याविषयीही माहिती देतात.
वे. शा. स. पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची कन्याही मनोरंजन विश्वात झळकते. भगरे गुरुजींची कन्या अनघा अतुल स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' मालिकेत अभिनय करते.
अनघा 'रंग माझा वेगळा' मालिकेत श्वेताची खलनायकी व्यक्तिरेखा साकारते. दीपा आणि कार्तिक यांच्या आयुष्यात वाद निर्माण करणाऱ्या श्वेतावर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होतो.
याआधी अनघाने महेश कोठारे यांच्या 'कोठारे व्हिजन'मध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम केलं आहे. तसंच ऋतुजा बागवेची मुख्य भूमिका असलेल्या 'अनन्या' नाटकातही तिने अनन्याची मैत्रीण प्रियांकाची भूमिका साकारली होती.
नुकतंच अनघाने सोशल मीडियावर आपलं बोल्ड फोटोशूट शेअर केलं होतं
अतुल भगरे गुरुजी सध्या झी मराठीवर 'घेतला वसा टाकू नको' या पौराणिक मालिकेचेही सूत्रसंचालन करतात. सणवाराच्या निमित्ताने भगरे गुरुजी त्यांच्याशी निगडित कथा आणि पौराणिक महत्त्व सांगतात.