अभिनेत्री परिणीती चोप्राने आपल्या स्टाईलशी व ग्लॅमरस अंदाजासाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी तिचा ब्लॅक साडीतील ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.त्यानंतर परिणीतीने आता आपल्या इन्स्ट्राग्रामवर वडिलांच्या शेतातील फोटो शेअर केले आहेत.
इंस्टाग्रामवरीलपोस्टमध्ये तिने वडिलांच्या शेतातील भेंडी, वांगी, हिरव्या मिरच्या याचे फोटोही टाकले आहेत.
माझ्या वडिलांच्या शेतात निवांतपणाचा अनुभव घेत आहे. त्यांनी खूप सुरुवातीपासून उभी केली आहे. अभिमान, आनंदी, व दयाळू मुलगी ... जिनिअस माणूस असे कॅप्शन तिने या फोटोना दिले आहे.
परिणितीच्या या पोस्टवर चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद देत कमेंट केल्या आहेत. परिणीती चोप्राचे वडील उद्योगपती व गायक आहेत