Marathi News Photo gallery Paris Olympic 2024 first medalist Manu Bhakar said that Sarabjot Singhs shot sealed our medal marathi News
‘हे पदक जितकं माझं, तितकंच त्याचंही आहे’; मनु भाकर मनमोकळं कोणाबद्दल बोलली
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत दोन पदके जिंकली आहेत. ही दोन्ही पदके मनु भाकर हिने मिळवली आहेत. 10 मीटर एअर पिस्तुल आणि 10 मीटर एअर पिस्तुल मिश्र यामध्ये कांस्य पदकाची कमाई केलीये. पदक जिंकल्यानंतर मनु भाकरच्या विधानाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
1 / 5
मनु भाकर हिने पहिल्याच दिवशी 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये कांस्यपदक जिंकत इतिहास रचला. नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी ती पहिला खेळाडू ठरली आहे. दुसरे पदक 10 मीटर एअर पिस्तुल मिश्रमध्ये मिळाले.
2 / 5
भारताकडून सरबज्योत सिंग आणि मनु भाकर यांनी 10 मीटर एअर पिस्तुल मिश्रमध्ये कांस्यपदक मिळवलं. पहिलं पदक जिंकल्यावर दुसऱ्याच दिवशी मनु आणि सरबज्योत यांनी मिळून इतिहास रचला. दुसरे पदक जिंकल्यावर माध्यमांशी बोलताना मनु भाकर पाहा काय म्हणाली.
3 / 5
हा दोघांचा इव्हेंट आहे,सरबज्योत सिंगच्या सहकार्याशिवाय हे पदक मी जिंकू नसते शकले. जितकं हे पदक माझं तितकंच त्याचंही आहे. आमच्या दोघांची भागीदारी समान राहिली आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणालाही झुकतं माप देऊ शकत नाही. सरबज्योत सिंगच्या शॉटने आमचं पदक निश्चित झाल्याचं मनु भाकर म्हणाली.
4 / 5
मनु भाकरचा मोठेपणा दिसून आला, सलग दोन पदके जिंकल्यावर तिने कसलीच डोक्यात हवा जाऊ दिली नाही. दुसरे पदक जिंकल्यावर त्याचं श्रेय आपल्या सहकारी खेळाडूला तिने दिलं.
5 / 5
मनु भाकर पदांची हॅट्रिक मारू शकते. ती म्हणजे येत्या 3 ऑगस्टला 25 मीटर एअर पिस्तुलची स्पर्धा होणार आहे. त्यामुळे आता देशवासियांना तिच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.