संदिप राजगोळकर, प्रतिनिधी - टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 14 डिसेंबर 2023 : काल संसदेत गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन तरूणांनी खासदार बसत असलेल्या बाकावर उडी मारली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला.
संसदेमधील गोंधळानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर पाहायला मिळत आहे. आज संसद परिसरात हजारो पोलीस तैनात आहेत.
माध्यमांना काही ठिकाणीच एन्ट्री आहे. दररोज येणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही कसून चौकशी केली जात आहे. संसद परिसरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू आहे.
संसदेच्या कामकाजापूर्वी सत्ताधारी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. संसदेमधील कालच्या गोंधळाच्या प्रकरणावर महत्त्वपूर्ण चर्चा होतेय.
संसदेतील गोंधळानंतर काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत बैठक होतेय. काल सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीबद्दल या बैठकीत चर्चा होतेय.