क्रिकेटचा बादशाह विराट कोहली आणि बॉलिवूडची दमदार अभिनेत्री अनुष्का शर्मा काही ना काही कारणाने सतत चर्चेत असते.
अनुष्का आणि विराटचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. त्यामुळे दोघेही नेहमी परफेक्ट कपल असल्याची झलक सोशल मीडियावरुन देत असतात.
आता अनुष्कानं विराटसोबतचे जबरदस्त फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. करवा चौथनंतरचे त्यांचे हे पहिलेच फोटो आहेत.
या फोटोमध्ये दोघंसुद्धा एकमेकांसोबत खूप खूश दिसत आहेत.
विराट आणि अनुष्काच्या या फोटोला चाहत्यांनी चांगलच पसंत केलं आहे.