'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अक्षरा म्हणजेच हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
हीना सध्या वाईनयार्डमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचं तिच्या पोस्टद्वारे कळतंय. गेले अनेक दिवस ती वाईनयार्डमधील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे.
गेले अनेक दिवस ती ट्रेंडी फोटोशूटसह चाहत्यांशी कनेक्ट होत आहे. तिचे हे ट्रेंडी लूक परफेक्ट समर लूक्स देत आहेत.
आता हीनानं मस्त पिवळ्या जंपसुटमध्ये फोटोशूट केलं आहे. या ट्रेंडी ड्रेससोबत हीनानं छान मॅचिंग गॉगल कॅरी केला आहे, तर सोबतच काळ्या रंगाची कॅपसुद्धा तिनं उत्तमरित्या कॅरी केली आहे. पिवळा हा रंग उन्हाळ्यात परिधान करण्यासाठी योग्य असतो त्यामुळे हीनाचा हा लूक तुम्ही या उन्हाळ्यात ट्राय करू शकता.
हीनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत.