नेहमीच हॉट आणि बोल्ड अवतारानं चाहत्यांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री नोरा फतेहीनं साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
नोरा नेहमीच आपल्या लूक्समुळे चर्चेत असते. तिच्या या फोटोमध्ये सुद्धा ती कमालीची सुंदर दिसतेय.
पिस्ता कलरच्या साडीमध्ये तिनं हे नवं फोटोशूट केलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे नोरानं हे खास फोटोशूट खास कारणासाठी केलं आहे.
नोराला बेस्ट परफॉर्मर म्हणून ‘दादासाहेब फाडके पुरस्कार 2021’ मिळाला आहे.
या पुरस्कारासोबत सुद्धा तिनं फोटो शेअर केले आहेत.