पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीत मोठा स्फोट झाला आहे. ज्यामध्ये जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत.
पाकिस्तानात याआधीही असे अनेक हल्ले झाले आहेत. पुन्हा एकदा झालेल्या या स्फोटाने पाकिस्तान पुन्हा हादरून गेला आहे.
सीसीपीओने सांगितले की प्राथमिक अहवालानुसार दोन हल्लेखोरांनी शहरातील किस्सा ख्वानी मार्केटमधील मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि तेथे पहारा देत असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला.
मशिदीत लोकांना टार्गेट करण्यात आले आणि मोठा स्फोट झाला. या घटनेने पाकिस्तान पुन्हा मोठ्या दहशतीच्या सावटाखाली गेला आहे.
कोचा रिसालदार मशिदीत नमाज अदा करण्यासाठी लोक जमले असताना हा स्फोट झाला. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
स्फोटानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोठी धावपळ करण्यात आली.