Photo : दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी, दादांनी थेट सॅल्यूटच ठोकला!
पुण्यातील काऊन्सिल हॉलसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आहेत. यात अनेक महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. अजित पवार यांच्या समर्थनात आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घेत शांतता बाळगण्याचं आवाहन केलं.
अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन
-
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. यात पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील बहिणींचा समावेश आहे.
-
-
या प्रकरणी अजित पवार आणि खुद्द शरद पवार यांनी भाजपला टोला लगावलाय. त्यानंतर आता पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी काऊन्सिल हॉलसमोर मानवी साखळी तयार केलीय.
-
-
पुण्यातील काऊन्सिल हॉलसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आहेत. यात अनेक महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. अजित पवार यांच्या समर्थनात आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जातेय.
-
-
अजित पवार यांचा शुक्रवारी पुणे दौरा असतो. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, अंकुश काकडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे.
-
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते विधान भवनासमोर आक्रमक झाले आहेत. त्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी अजित पवार यांना काऊन्सिल हॉलबाहेर यावं लागलं. त्यावेळी अजित पवारांनी सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.
-
-
दरम्यान, कोरोना आढावा बैठकीसाठी अजित पवार आज पुणै दौऱ्यावर आहेत. कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर अजितदादा कोरोना आढावा बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीला खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आणि जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी उपस्थित आहेत.