PHOTO | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला गोरेवाडा प्राणीसंग्रहालय सफारीचा आनंद
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं आहे. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्राणीसंग्रहालयाच्या सफारीचा आनंदही घेतला
-
-
गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाला आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा नामकरण सोहळा पार पडला.
-
-
त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलेल्या कोनशिलेचं अनावरण केलं. त्यावेळी त्यांच्यासोबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊतही उपस्थित होते.
-
-
औपचारिक कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री आदित्य ठाकरे, नितीन राऊत यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधीसमवेत प्राणी संग्रहालयाची पाहणी घेतली. एका बसमधून या सर्वांनी प्राणीसंग्रहालयाच्या सफारीचा आनंद घेतला.
-
-
मुख्यमंत्री हे स्वत: एक उत्तम फोटोग्राफर आहेत. त्यांचे अनेक फोटो गाजलेले आहेत. असं असताना कलाकार असलेल्या मुख्यमंत्र्यांना फोटो घ्यावा वाटला नसेल तरच नवल. मुख्यमंत्र्यांनी आपल्या फोनमधून प्राणीसंग्रहालयाचे अनेक फोटो घेतल्याचं पाहायला मिळालं.
-
-
दरम्यान, गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाला विदर्भवादी आणि आदिवासी संघटनांनीही विरोध दर्शवला होता.