PHOTOS: जगातील सर्वात महागडे 5 हिरे कोणते? किंमत आणि फोटो पाहून अवाक व्हाल…
हिऱ्यांना रत्नांमध्ये सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. त्यामुळेच कदाचित त्याची किंमत इतर रत्नांपेक्षा खूप अधिक असते. जगभरात असे अनेक हिरे आहेत. मात्र, त्यात असेही हिरे आहेत ज्यांची किंमत अब्जावधी रुपये आहे. अशाच जगातील सर्वात महागड्या 5 हिऱ्यांचा हा खास आढावा.
1 / 6

2 / 6
14.82 कॅरेटचा हा हिरा जगातील सर्वात महागडा नारंगी हिरा आहे. 2013 मध्ये जिनेव्हामधील क्रिस्टी नीलामी घराकडून त्याचा लिलाव करण्यात आला. तेव्हा हा हिरा 15.6 कोटी रुपये प्रति कॅरेटप्रमाणे विकला गेला. हा प्रति कॅरेटप्रमाणे विकल्या जाणाऱ्या हिऱ्यांमध्ये सर्वात महागडा आहे.
3 / 6
रत्नांचा राजा आहे हिरा, जाणून घ्या हे मौल्यवान रत्न कधी आणि कोणी घालावे हे
4 / 6
‘ब्लू मून’ नावाचा हा हिरा 2015 मध्ये 315 कोटी रुपयांना विकण्यात आला. एका अंगठीवर लावण्यात आलेला हा हिरा हाँगकाँगच्या जोसफ लू यांनी आपल्या मुलीसाठी घेतला होता. त्यानंतर या हिऱ्याचं नाव त्यांच्या मुलीच्या नावावरुन ‘ब्लू मून ऑफ जोसेफाईन’ असं ठेवण्यात आलं. हा हिरा 12.03 कॅरेट आहे.
5 / 6
‘पिंक स्टार’ जगातील दुर्मिळ हिऱ्यापैकी एक आहे. 59.6 कॅरेटचा हा हिरा अंड्याच्या आकाराचा आहे. 2017 मध्ये या हिऱ्याचा हाँगकाँगमध्ये लिलाव झाला. गुलाबी रंगाच्या या हिऱ्याला विक्रमी 462 कोटी रुपयांनी खरेदी करण्यात आलं.
6 / 6
‘ओपनहायमर ब्लू’ हिरा देखील दुर्मिळ आहे. 14.62 कॅरेटच्या या हिऱ्याचा लिलाव 2016 मध्ये स्विझरलंडमधील जिनेव्हा शहारातील क्रिस्टी नीलामी घरात झाला. त्यावेळी त्याची विक्री जवळपास 329 कोटी रुपयांना झाली.