-
-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुथ्यमंत्री अजित पवार यांनी शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावर जात शिवाजी महाराजांना नमन केलं. यावेळी त्यांच्यासोबत शिवरायांचे वंशज आणि खासदार संभाजीराजे छत्रपती, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
-
-
तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाळ शिवाजीचा पाळणाही जोजवला. यावेळी उपस्थित महिलांनी बाळ शिवाजीचा खास पाळणाही गायला.
-
-
दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात शिवरायांच्या पुतळ्याला नमन केलं. यावेळी त्यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
-
-
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही नागपुरात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं.
-
-
नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि वंदन केलं.
-
-
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातील पोवई नाका शिवतीर्थ येथे छत्रपती शिवरायांच्या स्मारकास अभिवादन केले आणि शुभ आशीर्वाद घेतले.
-
-
देशाची राजधानी दिल्ली येथे आज शिवजयंती उत्साहात साजरी झाली. संसदेच्या प्रांगणातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला श्रीमंत शहाजी छत्रपती यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन, उत्सवाला सुरुवात करण्यात आली.
संबंधित फोटो गॅलरी :
PHOTO | ‘प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर’ छत्रपती शिवाजी महाराजांची काही दुर्मिळ छायाचित्रे!
शिवजन्मोत्सव : ‘शालू’चा नववारी भरजरी अंदाज, राजेश्वरी खरातचे लेटेस्ट फोटो पाहिले का?
Greetings of Shivaji Maharaj on the occasion of Shiv Jayanti from the leaders of all political parties