Photos : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांची समांतर परेड
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांची समांतर परेड | Photos of Delhi Farmer Tractor Rally Republican Day parade
-
-
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राजधानी दिल्लीत दोन प्रजासत्ताक परेड झाल्या.
-
-
यापैकी एक परेड होती दरवर्षी होणारी सरकारची राजपथवरील प्रजासत्ताक परेड, तर दुसरी होती मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची परेड.
-
-
शेतकऱ्यांनी 26 जानेवारी रोजी दिल्ली सीमेवर विविध ठिकाणी ट्रॅक्टर मार्च काढत ही आगळीवेगळी परेड केली.
-
-
या ट्रॅक्टर मार्चमध्ये काही ठिकाणी आंदोलक आक्रमक झाल्याने संपूर्ण परेडच तशा पद्धतीने झाली की काय असं चित्र उभं राहिलं, मात्र या काही घटना वगळता शेतकऱ्यांची ही परेड आपल्या नियोजित मार्गांवर शांततेत पार पडली.
-
-
या ट्रॅक्टर रॅलीत मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते.
-
-
ट्रॅक्टर मार्चमधील प्रत्येक वाहनावर आणि व्यक्तीच्या हातात राष्ट्रध्वज तिरंगा अभिमानाने फडकावला जात होता.
-
-
लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांकडे तिरंगा असल्याचं पाहायला मिळालं.
-
-
या ट्रॅक्टर मोर्चात शेकडो ट्रॅक्टर शिस्तबद्धपणे आपल्या निश्चित मार्गाने संचलन करत होते.
-
-
दिल्लीच्या सीमेवरील रस्त्यांना त्यामुळे अगदी दिल्लीच्या राजपथचं रुप आलं होतं.
-
-
रस्त्यावरील शेकडो ट्रॅक्टरच्या रांगा या मोर्चाची भव्यता दाखवत होत्या.