Photos : सेवाग्राममध्ये जगातील सर्वांत उंच चरख्यासह 161 कोटींची कामं पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई लोकार्पण
सेवाग्राममध्ये जगातील सर्वांत उंच चरख्यासह 161 कोटींची कामं पूर्ण झाली. या सर्व कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई लोकार्पण करण्यात आलं.
-
-
सेवाग्राममध्ये जगातील सर्वांत उंच चरख्यासह 161 कोटींची कामं पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई लोकार्पण
-
-
-
सेवाग्राम विकास आराखडया अंतर्गत ही सर्व कामं करण्यात आली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे, तर पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार समक्ष उपस्थित होते.
-
-
सेवाग्राम येथील महात्मा गांधी आर्युविज्ञान महाविद्यालयाच्या नविन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित आसन व्यवस्था असल्यामुळे निमंत्रण पत्रिका असलेल्या मान्यवरांनाच प्रवेश देण्यात आला.
-
-
सेवाग्राम आश्रम परिसरात पर्यंटकांना राहण्याची सुविधा व्हावी यासाठी 76 व्यक्ती क्षमतेचे यात्री निवास, सुसज्ज डॉरमेट्री, सेवाग्राम आश्रमाला पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी तयार करण्यात आली आहे. पर्यंटकांची 300 चारचाकी वाहने उभी राहू शकतील असे वाहनतळा सोबतच महिला आणि पुरुषांसाठी प्राथमिक सुविधा केंद्र तयार करण्यात आले.
-
-
चरखागृहात जगातील सर्वांत उंच म्हणजे 18.5 फुट उंचीच्या चरख्याची उभारणी करण्यात आली आहे. सभागृहाची शोभा वाढवण्यासाठी जगातील पहिलेच आणि भारतातील एकमेव अशा महात्मा गांधींचे 31 फूट आणि विनोबा भावे यांचे 19 फूट उंचीचे स्क्रॅपपासून व्यक्तीचित्र उभारण्यात आले आहे.
-
-
विनोबा भावे यांच्या पवनार येथील परिसरात धाम नदीच्या तीरावरील सौदर्यकरण करुन दक्षिणेकडील भागात नागरिकांना नदीवर मूर्ती विर्सजन करण्यासाठी 1 लाख लिटर पाण्याची क्षमता असलेले डोळ्याच्या आकाराच्या कुंडाची निर्मिती करण्यात आली.
-
-
वर्धा शहरातील महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, झाशीराणी चौक, विश्रामगृहचौक , सेवाग्राम मेडिकल कॉलेज चौक, इत्यादी 9 चौकांमध्ये ऐतिहासिक घटना दर्शविणारे शिल्प निर्मिती करुन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
-
-
या चौकातील रोषणाई रात्रीच्या वेळेला शहराच्या सौंदर्यात भर घालते. वर्धा शहरातल्या ऐतिहासिक वास्तूंना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांचे बांधकाम सौंदर्यीकरण आणि पादचारी रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
-
-
यंदा कोरोनाचा सावट असल्याने मास्क आणि शारीरिक अंतर ठेवून साध्या पद्धतीने जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सेवाग्राम गावात गांधींजींच्या बनारस विद्यापीठातील पहिल्या भाषणाच्या प्रतींचं वाटप आणि वाचन देखील झालं.
-
-
आश्रमाच्या परंपरेनुसार पहाटे 5 वाजून 45 मिनिटांनी नई तालिम शाळेच्या घंटा घरातून प्रार्थनेला सुरुवात झाली.
-
-
सकाळी 6 वाजता बापुकुटी समोर प्रार्थना झाली. सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत अखंड सूत यज्ञ करण्यात आले. या सूत यज्ञावेळी भजन कीर्तनाचा कार्यक्रमही झाला.