Photos : मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात किसान सभा रस्त्यावर, अकोल्यात भव्य मोर्चा
महाराष्ट्रात ठिकठिकाणी केंद्राच्या कायद्यांना शेतकरी कामगार विरोधी म्हणत निषेध आंदोलनं झाली.
-
-
देशभरात मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे.
-
-
देशभरातील शेतकरी संघटनांनी 26-27 नोव्हेंबरला चलो दिल्लीचं आवाहन करत दिल्लीत जाऊन केंद्राला जाब विचारण्याचा निर्णय घेतला.
-
-
हरियाणा आणि पंजाबमध्ये या आंदोलनाची तीव्रता सर्वात जास्त आहे.
-
-
महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी केंद्राच्या कायद्यांना शेतकरी कामगार विरोधी म्हणत निषेध आंदोलनं झाली.
-
-
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला.
-
-
किसान सभेच्या या मोर्चात पुरुष शेतकऱ्यांसह महिला शेतकऱ्यांचाही विशेष सहभाग पाहायला मिळाला.