Photos : अहदनगरमध्ये ग्रामपंचायत निकालाचा जल्लोष, कुठं जेसीबीतून गुलाल, तर कुठं खांद्यावर मिरवणुका
अहदनगरमध्ये ग्रामपंचायत निकालानंतर विजयाच्या आनंदात चांगलाच जल्लोष पाहायला मिळाला. कुठं जेसीबीतून गुलाल उधळण्यात आला, तर कुठं याच जेसीबीतून विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली.
-
-
अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा चांगलाच जल्लोष पाहायला मिळाला. संगमनेरमधील देवगाव येथे मिरवणुकीसाठी थेट जेसीबीच वापरल्याचं दिसलं.
-
-
याशिवाय अहमदनगरमध्ये इतरही ठिकाणी जेसीबीने गुलाल उधळत निवडणुकीत विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.
-
-
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह आमदार सुधीर तांबे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही चांगलाच जल्लोष केला.
-
-
सर्वांचेच लक्ष लागलेल्या अहमदनगरमधील आदर्शगाव हिवरेबाजार आणि राळेगणसिद्धीतही यंदा निवडणुका झाल्या. यात हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांच्या पॅनलचा विजय झाला.
-
-
पोपटराव पवार यांच्या विजयानंतर स्नेहालय संस्थेचे प्रमुख गिरीश कुलकर्णी यांनी स्वतः हजर राहून त्यांना सदिच्छा दिल्या.
-
-
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजयाच्या मिरवणुकांमध्ये लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचाच दांडका उत्साह पाहायला मिळाला.
-
-
या विजयी मिरवणुकांमध्ये तरुणांचा उत्साह उल्लेखनीय होता. याच उत्साहाने अनेक ठिकाणच्या निवडणुका चुरशीच्या केल्या.
-
-
एकूणच राज्यातील या निवडणुकांच्या निकालानंतर सर्वत्र जल्लोष पाहायला मिळाला.
-
-
इतरवेळी मागे राहणाऱ्या महिलांनी या मिरवणुकांमध्ये चांगलाच ठेका धरला. यात तरुण मुलींसोबतच अगदी वयोवृद्ध महिलांचाही समावेश होता.
-
-
एकूणच राज्यातील या निवडणुकांच्या निकालानंतर सर्वत्र जल्लोष पाहायला मिळाला.