PHOTOS: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, कृषी कायदे रद्द करण्यासाठी भारत बंद, रेल्वे, रस्ते आणि बँकावरही परिणाम
शेतकरी आंदोलनाला 4 महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळेच आक्रमक शेतकरी आंदोलकांनी भारत बंदची हाक दिली. याला प्रतिसाद म्हणून देशभरातील अनेक शहरांमध्ये भारत बंदचा परिणाम पाहायला मिळाला. शेतकऱ्यांनी सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग बंद केले. तसेच सायंकाळनंतर पुन्हा रस्ते खुले केले.
पटियालामध्ये शेतकऱ्यांनी भारत बंद दरम्यान जोरदार घोषणाबाजी करत कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली.
Follow us on
अमृतसरमध्ये भारत बंद अंतर्गत शेतकऱ्यांनी रेल्वे ट्रॅक ब्लॉक केला.
जालंधरमध्ये शेतकर्यांनी पंजाब नॅशनल बँकेची शाखा बंद केली.
पटियालामध्ये शेतकऱ्यांनी भारत बंद दरम्यान जोरदार घोषणाबाजी करत कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली.
या भारत बंदच्या काळात काही प्रमाणात सर्वसामान्य प्रवाशांचीही कोंडी झाल्याचं दिसलं.
महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे भारत बंद अंतर्गत APMC टर्मिनल ठप्प झालेलं पाहायला मिळालं.