PHOTOS: भारतातील एकमेव शाकाहारी गाव, सर्व लोकांच्या या सवयीमागील अजब गोष्ट, वाचा…
विविधतेने नटलेल्या भारतात प्रत्येक गावाची एक वेगळी गोष्ट असते. असंच एक गाव आहे जे देशातील एकमेव शाकाहारी गाव असल्याचं सांगितलं जातं. या गावातील सर्व लोक शाकाहारी आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे.
चांगल्या समाजासाठी मांस, मासे, दारु सोडणे आवश्यक असल्याचं त्याचं मत होतं. लोक त्यांची गोष्ट ऐकायचेही. त्यामुळेच अनेक लोकांनी शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला. या गावातील लोकांनी देखील मनापासून शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला.
Follow us on

बिहारमधील नवादा जिल्ह्यातील राजगीर पहाडी भागात वसलेल्या या गावाचं नाव मोतनाजे असं आहे. या गावातील सर्व लोक शाकाहारी आहेत हे ऐकूण तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, पण हे खरं आहे. त्यामुळेच या गावाला लोक सात्विक गाव या नावानेही ओळखतात.
या गावात 70 ते 80 घरं आहेत. या गावातील रहिवाशांचे पूर्वज रुस्तमपूरहून आल्याचं सांगितलं जातं. मांगो दास आणि भीम दास अशी त्यांची नावं. त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारल्याने त्यांना शिक्षा दिल्याचंही सांगितलं जातं.
मांगो दास आणि भीम दास हे प्रसिद्ध पहिलवान होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं. त्या दोघांशी कुणाचीही लढण्याची हिंमत होत नसे. त्यांनी ग्रामीण भागात शाकाहारी होण्याचं आवाहन करत मोहिमच सुरु केली होती. ते लोकांना शाकाहारी होण्याचं आवाहन करत.