पहिल्यांदाच मलायका अरोरा तिच्या ब्रेकअप आणि अर्जुन कपूरबद्दलच्या विषयांमुळे नाही तर दुसऱ्या कारणामुळे आता चर्चेत आली आहे.
मलायका अरोराने तिच्या आयुष्यात आता नवीन सुरुवात केली आहे. मलायकाने मुलगा अरहानबरोबर मिळून नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे.
‘स्कार्लेट हाउस’ असे या रेस्टॉरंटचे नाव असून हे रेस्टॉरंट मुंबईतील वांद्रे येथील 90 वर्षे जुन्या पोर्तुगीज बंगल्यात आहे.
रेस्टॉरंटची रंगसंगतही अत्यंत सुंदर आहे. रेस्टॉरंट बोल्ड स्कार्लेट रंगात रंगवण्यात आलं आहे.
रेस्टॉरंट अतिशय वेगळ्या ढंगात आणि जुन्या काळी असलेल्या वास्तूंची जीणीव आणि आठवण करून देणारं आहे,
शटर विंडो, व्हिक्टोरियन खुर्च्या, फ्लोरल इंटिरियर व ग्रामोफोन यामुळे रेस्टॉरंटचा लूक फारच वेगळा आणि आकर्षक ठरतोय.
या रेस्टॉरंटची सीटिंग अरेंजमेंटदेखील फार वेगळ्या पद्धतीत तयार करण्यात आली आहे
बीना नोरोन्हा या स्कार्लेट हाऊसच्या मुख्य शेफ आहेत. त्या स्वतः मलायकासाठी हेल्दी पदार्थ बनवतात.
रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये हंगामी फळांचा समावेश असलेले सॅलड्स, बाजरीचे नूडल्स, जपानी कॉफी ग्रेड मॅचा, ग्लूटेन-फ्री रॅप्स आणि ज्वारीचा रिसोटो यासारख्या पदार्थांचा समावेश आहे.
मलायका अरोराचे चाहतेही तिच्या या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा देत आहेत.