वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येसह ऑक्सिजनची कमतरता हाही मोठा प्रश्न तयार झाला. यावर उपाय म्हणून रेल्वेने ऑक्सिजनची वाहतूक होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात कहर केलाय. वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येसह ऑक्सिजनची कमतरता हाही मोठा प्रश्न तयार झाला. यावर उपाय म्हणून रेल्वेने ऑक्सिजनची वाहतूक होत आहे. त्यासाठी खास ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवली जात आहे.
Follow us on
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात कहर केलाय. वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येसह ऑक्सिजनची कमतरता हाही मोठा प्रश्न तयार झाला. यावर उपाय म्हणून रेल्वेने ऑक्सिजनची वाहतूक होत आहे. त्यासाठी खास ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवली जात आहे.
ऑक्सिजन एक्स्प्रेस देशातील विविध राज्यांमधील ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पातून ऑक्सिजन टँकरची वाहतूक कमतरता असलेल्या ठिकाणी करत आहे.
रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत लिहिलं, “उत्तर प्रदेशमध्ये ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी लखनौ येथून बोकारोमध्ये असलेल्या स्टील प्लँटकडे निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस वाराणसीच्या पुढे निघालीय.
ऑक्सिजन एक्स्प्रेस वेगाने प्रवास करु शकेल यासाठी रेल्वेने खास ग्रीन कॉरिडोअर तयार केलाय. त्यामुळे कोणत्याही रेड सिग्नलशिवाय ऑक्सिजन एक्स्प्रेस कमी वेळेत अधिकाधिक अंतर पार करत आहे. दिल्ली हाईउच्च न्यायालयाने ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या गाड्या कोणत्याही अडथळ्याशिवाय रुग्णालयांपर्यंत पोहचवण्याचे आदेश दिलेत.
दिल्ली हाई कोर्टाने केंद्र सरकारला निर्देश दिले, “पानिपत येथे ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पानिपत दिल्लीपासून 2 तासाच्या अंतरावर आहे. तेथून दिल्लीत ऑक्सिजन येण्यास कोणताही अडथळा येऊ नये. जेणेकरुन लोकांचे जीव वाचू शकतील. दिल्लीत येणारे ऑक्सिजन टँकर कोणत्याही अडथळ्यांशिवाय येतील याची व्यवस्था करावी. ऑक्सिजन टँकरच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.”
“केंद्र सरकारने 21 आणि 22 एप्रिलला देण्यात आलेल्या आदेशांचं कठोरपणे पालन करावं. आदेशांवर अंमलबजावणी न झाल्यास आपल्याला अनेक जीव गमवावे लागतील. तो गुन्हा आहे,” असंही न्यायालयाने नमूद केलं होतं.