PHOTOS : एका दिवसात 100 पेक्षा जास्त लोकांची हत्या, म्यानमारमधील सैन्याकडून दडपशाही, जगही हैराण
म्यानमारमध्ये सैन्याने सरकार उलथवून टाकत सत्ता ताब्यात घेतलीय. या विरोधात तेथे जोरदार आंदोलन (Myanmar Protests) आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी सैन्याकडून खुलेआमपणे नागरिकांच्या हत्येचं सत्र सुरु आहे.
-
-
म्यानमारमध्ये सैन्याने सरकार उलथवून टाकत सत्ता ताब्यात घेतलीय. या विरोधात तेथे जोरदार आंदोलन (Myanmar Protests) आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी सैन्याकडून खुलेआमपणे नागरिकांच्या हत्येचं सत्र सुरु आहे.
-
-
म्यानमारमधील नागरिक लोकशाहीची मागणी करत आपल्या आंदोलनावर ठाम आहे. त्यासाठी ते वारंवार रस्त्यावर उतरुन सैन्याच्या दडपशाहीचा विरोध करत आहेत. मात्र, हा विरोध संपवण्यासाठी सैन्याकडून सामान्य नागरिकांच्या हत्येचं सत्र सुरु आहे.
-
-
सैन्याने एक दिवसात जवळपास 114 लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे (Myanmar Protests Against Military Coup). शनिवार (27 मार्च) हा दिवस म्यानमारमधील सत्तापालटानंतरचा सर्वात हिंसक दिवस ठरलाय.
-
-
सैन्याने सरकार उलथवून टाकत म्यानमारमधील प्रमुख नेत्यांना अटक केलीय. तसेच पुढील 1 वर्षासाठी आणीबाणी घोषित केली आहे. या काळात नागरिकांचा विरोध दडपताना अनेकांच्या हत्या होत आहेत.
-
-
शनिवारी हत्या करण्यात आलेल्या 114 जणांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. ही आकडेवारी म्यानमारमधील माध्यमं आणि संशोधनकर्त्यांनी जाहीर केलाय (Myanmar Protests After Coup).
-
-
याआधी 14 मार्चला सर्वाधिक लोकांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे म्यानमारमधील एकूण मृत्यूचा आकडा आता 420 वर पोहचला आहे.
-
-
विशेष म्हणजे मधला काळ सोडला तर त्याआधी देखील 5 दशकं म्यानमारमध्ये सैन्य सरकारच होतं. मोठ्या संघर्षानंतर येथे लोकशाही प्रस्थापित झाली होती. मात्र, सैन्याने पुन्हा बंड करत ती मोडीत काढली आहे.