Photos | पालघरच्या आदिवासी भागातही आधुनिक शेती, 11 एकरात 26 हजार स्ट्रॉबेरीची लागवड
सुरगाणा तालुक्यात शेतकऱ्यांना एकत्र करून स्ट्रॉबेरीच्या उत्पन्नाचा यशस्वी प्रयोग करणारे कृषी अधिकारी अनिल गावित यांनी पालघरमध्येही हा प्रयोग यशस्वी केलाय.
-
-
सुरगाणा तालुक्यात शेतकऱ्यांना एकत्र करून स्ट्रॉबेरीच्या उत्पन्नाचा यशस्वी प्रयोग करणारे कृषी अधिकारी अनिल गावित यांनी पालघरमध्येही हा प्रयोग यशस्वी केलाय.
-
-
गावित यांनी पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळवले आहे.
-
-
मोखाडा तालुक्यात 42 ठिकाणी, तर जव्हार तालुक्यात 44 ठिकाणी 11 एकर क्षेत्रावर जवळपास 26 हजार स्ट्रॉबेरीच्या झाडांची प्रायोगिक तत्वावर लागवड केली आहे.
-
-
पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा तालुक्यात अतिदुर्गम आदिवासी भागातील शेतकरी पारंपरिक नाचणी, वरईची शेती करतात. या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही पिके घेतली जात नाही.
-
-
रोजगार नसल्यामुळे येथे बेरोजगारी वाढली आहे. उपजीविकेसाठी मोठ्या प्रमाणात आदिवासी कुटुंबं शहराकडे स्थलांतर करत आहेत. त्यामुळे काही वर्षांपासून हे तालुके नेहमीच कुपोषण, बालमृत्यूमुळे चर्चेत आले आहेत.
-
-
– यात मॅंगनीज, पेटासियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 9 सर्वकाही असतं.
-
-
काय आहेत स्ट्रॉबेरी खाण्याचे फायदे? – स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन आणि फायबरचं प्रमाण मोठ्या असतं. यामध्ये पॉलिफेनोल्स नावाच्या अँटी-ऑक्सिडेंट देखील असतात. स्ट्रॉबेरीमध्ये सोडियम, चरबी, कोलेस्ट्रॉल नसून कमी कॅलरीयुक्त पदार्थ असतात.
-
-
स्ट्रॉबेरी ही आपल्या शरीरासाठी हिवाळ्यात म्हणजेच डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात चांगली असते. हिवाळ्यात, आपल्या शरीरातील अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता भरून काढायची असेल तर त्यासाठी आहारात (Diet) स्ट्रॉबेरीचा समावेश करणं खूप महत्त्वाचं आहे. Webmd च्या वृत्तानुसार, स्ट्रॉबेरी खाल्ल्याने आरोग्यास खूप चागंले फायदे होतात.