मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भोपाळ येथील स्मार्ट सिटी पार्कमध्ये पिंपळाचं झाड लावलं.
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी रामपूरमधील एका गावात वृक्षारोपण केलं.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही वृक्षारोपण करत जागतिक पर्यावरण दिन साजरा केला.
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी वृक्षारोपण करताना मिशन 5.0 कोटी वृक्षारोपणाचं लक्ष्य ठेवत मोहिमेची घोषणा केली.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मॅगनोलियाचे 21 झाडं लावली.