जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाच्या प्रमुखाचं नाव जिओना चाना (ziona chana) असं आहे. यासाठी ते जगभरात ओळखलं जातात. जिओना यांना 39 बायका आहेत. याशिवाय त्यांना या 39 बायकांपासून 90 पेक्षा अधिक मुलंही आहेत. जिओना यांच्या मुलांचीही लग्न झाली आहेत. त्यांच्यापासून त्यांना 30 पेक्षा अधिक नातू आहेत. अशाप्रकारे जिओना यांचं कुटुंब 180 पेक्षा अधिक लोकांचं झालंय.
जिओना चाना (ziona chana) आपल्या एकत्र (संयुक्त) कुटुंबासोबत मिझोरम राज्यातील बटवंग गावात राहतात. येथे त्यांनी सर्वांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून एक मोठं घरंच बांधलंय. या दुर्गम भागात चाना आपल्या मुलांसोबत सुतार म्हणून काम करतात. त्यांच्या घरात एकूण 100 खोल्या आहेत.
जगातील सर्वात मोठ्या या कुटुंबासाठी एक मोठं स्वयंपाक घर देखील आहे. येथे जवळपास 200 जणांचं जेवण तयार करण्याची व्यवस्था आहे. घरातील महिला जेवणाच्या तयारीसाठी सकाळपासूनच कामाला लागतात.
या कुटुंबाला एका दिवसात जवळपास 45 किलो तांदूळ, 25 किलो दाळ, 60 किलो भाजी, 30 ते 40 कोंबड्या आणि अनेक अंडे लागतात. याशिवाय हे कुटुंब दररोज 20 किलो फळंही खातं. एखाद्या सर्वसामान्य कुटुंबाला 2 महिने जिकतं रेशन लागतं तेवढं या कुटुंबाला केवळ एका दिवसासाठी लागतं.
मिझोरममध्ये होणाऱ्या निवडणुकीत या कुटुंबाची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. त्यामुळेच चाना कुटुंबाला निवडणुकीच्या काळात खूपच महत्त्व दिलं जातं. हे कुटुंब ज्या पक्षाला पाठिंबा देतं तो पक्ष जिंकणार असंच मानलं जातं.