Photos : समाजसेवेचा अविरत वसा घेणाऱ्या आमटे कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या ‘डॉ. शीतल आमटे-कराजगी’
महाराष्ट्रातील तरुण आणि तडफदार सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. त्यांच्या आयुष्यातील कामांची ओळख करुन देणारा चित्रमय प्रवास.
-
-
महाराष्ट्रातील तरुण सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याने देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
-
-
शीतल आमटे यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पातच काम करण्यास सुरुवात केली. बाबा हयात असल्यापासूनच त्या या कामात सक्रीय होत्या.
-
-
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शीतल आमटे यांचे काका डॉ. प्रकाश आमटे यांच्यासोबतही त्यांनी काही काळ काम केलं.
-
-
डॉ. शीतल आमटे यांना नेहमीच ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्यासोबतच्या आपल्या विशेष नात्याबाबत अभिमान वाटत आला. आपल्या संपूर्ण आयुष्यात बाबांच्या आदर्शांवर मार्गक्रमण करण्याचाही संकल्प त्यांनी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवला होता.
-
-
शीतल आमटे यांनी त्यांचं लग्न आणि बाबा आमटे याबाबत एक खास घटना सांगितली होती. शीतल आमटे म्हणाल्या होत्या, “माझं आणि माझ्या पतीचं जीवन खरंच स्पेशल आहे. 2007 ला आमचं लग्न बघायला लग्नाचे टार्गेट घेऊन स्वतः बाबा (आमटे ) जगले. त्यांच्या खोलीत गौतम कराजगी नावाची पाटी होती. इतका स्पेशल ‘ऑनर’ कुणालाच आजवर मिळालेला नाही.”
-
-
शीतल आमटे आपले आई वडील डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांच्यासोबत आनंदवन येथेच राहत होत्या. लग्नानंतर त्याचे पती गौतम कराजगी हे देखील आपली बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून आनंदवनात काम करण्यासाठी आले.
-
-
शीतल आमटे यांनी आनंदवनातील आपल्या कारकीर्दीत अनेक उपक्रम राबवले.
-
-
या उपक्रमांमध्ये आनंदवनाची कामाची, तेथे तयार झालेल्या वस्तूंची आणि विचारांची माहिती जगाला व्हावी म्हणून भरवण्यात येणाऱ्या एक्झिबीशनचाही समावेश होता.
-
-
शीतल आमटे यांच्या नेतृत्वात आनंदवनमध्ये शेतीचे अनेक प्रयोग झाले.
-
-
यात शेतीच्या पद्धतीसोबतच पिकांमध्येही नाविन्य आलं.
-
-
त्या एक उत्तम चित्रकार देखील होत्या. त्यांचे अनेक पेंटिंग प्रसिद्ध आहेत. त्यांनी आत्महत्या केली त्या दिवशीही एक ट्विट करत आपलं ‘वॉर अँड पीस’ नावाचं पेटिंग शेअर केलं होतं.
-
-
शीतल आमटे यांनी आनंदवनाच्या परिसरात वृक्षतोड झालेल्या अनेक ठिकाणी वृक्षारोपणाची मोठी मोहिम राबवली आणि तेथील परिस्थितीचा कायापालट केला.
-
-
त्यांनी आनंदवनातील शाळांचा गुणवत्ता विकास व्हावा म्हणूनही विशेष प्रयत्न केले. या शाळेत दिव्यांग मुलं, मतिमंद मुलं, कर्णबधिर, अस्थिव्यंग आणि दृष्टीबाधित मुलांचा समावेश होता.
-
-
शीतल स्वतः शिक्षणाने डॉक्टर असल्याने त्यांनी आनंदवनातील कुष्ठरोग निवारणासाठीही महत्त्वाचं काम केलं.
-