Photos : मास्कवरुन वाद, तरुणाने खुलेआम पोलीस अधिकाऱ्याच्या थोबाडीत लगावली, व्हिडीओ व्हायरल
उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. या व्हिडीओत गाडीत बसलेला एक पोलीस कर्मचारी एका तरुणाची मास्क न घातल्याने चौकशी करत असल्याचं दिसतंय.
1 / 5
उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. या व्हिडीओत गाडीत बसलेला एक पोलीस कर्मचारी एका तरुणाची मास्क न घातल्याने चौकशी करत असल्याचं दिसतंय. यावेळी युवकाच्या मागे दुसरा एक पोलीस कर्मचारी उभा असलेला दिसतोय. मात्र, बोलता बोलताच गाडीत बसलेला पोलीस कर्मचारी संबंधित युवकाची कॉलर पकडून त्याच्या थोबाडीत मारतो.
2 / 5
पोलिसाने मारल्यानंतर संतापलेला युवकही त्या पोलिसाच्या मुस्कटात मारुन पळून जाताना दिसतो आहे. विशेष म्हणजे ही सर्व घटना कुणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आहे.
3 / 5
ही घटना उत्तर प्रदेशमधील कुशीनगरच्या पटहेरवा पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. या ठिकाणी पोलीस विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत होते. यावेळी जीपमध्ये बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याने एका युवकाला मास्क न घातल्याने बोलावलं. तसेच मास्क न घालण्याचं कारण विचारलं. यावरुनच दोघांमध्ये वाद झाला. यात पोलीस अधिकाऱ्याने अचानक तरुणाच्या थोबाडीत लगावली. त्यानंतर संतापलेल्या युवकानेही या अधिकाऱ्याच्या थोबाडीत मारुन पळ काढला.
4 / 5
यावेळी पोलीस अधिकाऱ्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला. आरोपी तरुणाच्या मागे पळूनही तो पोलिसांच्या तावडीत सापडला नाही. ही घटना घडली तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या कुणीतरी याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होतोय. त्यामुळे आता पोलीस या आरोपी तरुणाचा कसून शोध घेत आहेत.
5 / 5
या प्रकरणी एसएसपी कुशीनगर सचिंद्र पटेल म्हणाले, "पोलिसांनी संबंधित तरुणाला बोलावून मास्क न घातल्याबाबत विचारणा केली होती. त्यावर त्याने उलट उत्तर दिलं. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याने त्याला एक चापट मारत यापुढे घरुन निघताना मास्क घालण्याची ताकीद दिली. मात्र, त्याने पोलिसांवरच हात उगारला. आरोपी तरुणाला अटक करुन त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल. त्याच्याविरोधात कठोर कारवाई होईल. सध्या त्याचा शोध घेतला जात आहे."