जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गिर राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. जंगल सफारीचा आनंद घेतानाचे नरेंद्र मोदी यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी गुजरातमधील वंतारा येथील वन्यजीव संरक्षण आणि बचाव केंद्रात देखील वेळ घालवला.
गिर राष्ट्रीय उद्यानात मोदींनी लायन सफारी केली.
या उद्यानात नरेंद्र मोदी यांनी सिंहाचे फोटोदेखील काढले.
गुजरातमधील वंतारा येथील वन्यजीव संरक्षण आणि बचाव केंद्रात पंतप्रधान मोदी एका पांढऱ्या सिंहाच्या पिल्लासोबत दिसले.
पंतप्रधान मोदी वंतारा येथे पांढऱ्या वाघाच्या डोळ्यात डोळे घालून पाहात असतानाचा हा फोटो.
पंतप्रधान मोदी वंतारा येथील वन्यजीव बचाव केंद्रात लेमर प्राण्यासोबत वेळ घालवताना दिसले.
वन्यजीव संरक्षण आणि बचाव केंद्रात पांढऱ्या सिंहीणींसोबत पंतप्रधान मोदी.