पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी त्यांची प्रत्येक दिवाळी सीमेवर जवानांसोबत साजरी केली आहे. 2014 साली मोदींनी सीयाचीनला जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.
Follow us on
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यासाठी मोदी सकाळीच उत्तराखंडमध्ये दाखल झाले.
भारत-चीन सीमेजवळ हर्षिल येथे आयटीबीपीच्या जवानांसोबत मोदींनी संवाद साधला आण दिवाळी साजरी केली.
दिवाळी साजरी केल्यानंतर ते केदारनाथसाठी रवाना झाले. केदारनाथच्या दर्शनानंतर ते विविध योजनांचा आढावा घेणार आहेत.
पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी त्यांची प्रत्येक दिवाळी सीमेवर जवानांसोबत साजरी केली आहे. 2014 साली मोदींनी सीयाचीनला जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.
2015 साली मोदी पंजाबच्या सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गेले होते. 2016 साली हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन मोदींनी जवानांशी संवाद साधला, तर गेल्यावर्षी मोदींनी जम्मू-काश्मीर येथील गुरेजमध्ये जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
देशाच्या संरक्षणासाठी वर्षभर सीमेवर लढणाऱ्या जवानांचं धैर्य आणखी वाढवण्यासाठी मोदी प्रत्येक दिवाळीला त्यांच्याशी संवाद साधतात. आपल्या कुटुंबीयांपासून कोसो दूर असणाऱ्या जवानांशी संवाद साधून त्यांनाही सण-उत्सवात सहभागी करुन घेण्याची परंपरा मोदींनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून जोपासली आहे.
दरम्यान इस्त्रायलचे पतंप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनीही ट्विटरवरुन नरेंद्र मोदी आणि भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे नेतान्याहू यांनी हिंदी भाषेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “इस्रायलच्या जनतेच्या वतीने मी माझे खास मित्र नरेंद्र मोदी आणि भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. या प्रकाशमय सणामुळे तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येवो, असं ट्वीट नेतान्याहू यांनी केलं.