तुमच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल नसेल अथवा व्यवसाय वाढीसाठी निधीची गरज असेल तर भारत सरकारची ही योजना मदतीला येऊ शकते. केंद्र सरकारने 2015 मध्ये पंतप्रधान मुद्रा योजना सुरू केली आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत सरकार बिगर कृषी बिगर कॉर्पोरेट लघु आणि सूक्ष्म उद्योग उभारणाऱ्या लोकांना कर्ज उपलब्ध करून देते. सरकार शिशु, किशोर आणि तरुण वर्गांचा समावेश आहे.
शिशु श्रेणीत, वर्गात 50,000 रुपये ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. तर तरुण वर्गाला 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. अजून एक तरूण प्लस वर्ग आहे. त्यातील उद्योजकाला 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते.
तरुण प्लस वर्गात त्याच व्यक्तीला 20 लाखांचे कर्ज देण्यात येते. ज्याने यापूर्वी या योजनेतून कर्ज घेतले आणि त्याची वेळेत परतफेड केली. यापूर्वी ज्यांनी मुद्रा कर्ज घेतले आणि ते वेळेत फेडले त्यांना मदत होते.
बँका, वित्तीय संस्थांमध्ये कर्जासाठी चौकशी करु शकता. कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही अधिकृत संकेतस्थळ http://www.mudra.org.in/ ला भेट देऊ शकता. येथून अर्ज डाउनलोड करता येईल. त्यानंतर सर्व तपशील भरुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. पुढील सोपास्कार आणि प्रक्रिया संबंधित बँकेतील शाखा व्यवस्थापक करतो.