Marathi News Photo gallery PM Narendra Modi in Germany to attend G 7 summit; He will also interact with people from the Indian community
PM Narnedra Modi: G-7 परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीत ; भारतीय समुदायातील लोकांशीही साधणार संवाद
G-7 शिखर परिषदेत युक्रेन-रशिया युद्ध, इंडो-पॅसिफिकमधील परिस्थिती, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, हवामान यासह महत्त्वाच्या जागतिक आव्हानांवर चर्चा होणार आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी परिषदेत सहभागी होणाऱ्या प्रमुख नेत्यांची स्वतंत्रपणे भेट घेणार आहेत.
1 / 7
G-7 परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीला पोहोचले आहेत. जर्मनीच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. यामध्ये जगातील सात शक्तिशाली देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींचे जर्मनीतील म्युनिक येथे आगमन होताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. बव्हेरियन बँडच्या सुरात विमानतळावर त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले.
2 / 7
म्युनिक विमानतळाबाहेर भारतीय समुदायाच्या लोकांनीही पंतप्रधान मोदींचे जल्लोषात स्वागत केले. अनिवासी भारतीयांनी 'मोदी-मोदी' आणि 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या.
3 / 7
G-7 गट हा जगातील सात श्रीमंत देशांचा समूह आहे, ज्याचे नेतृत्व सध्या जर्मनी करत आहे. या गटात ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि अमेरिका यांचा समावेश आहे. अर्जेंटिना, इंडोनेशिया, सेनेगल, दक्षिण आफ्रिका या देशांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
4 / 7
मी शिखर परिषदेदरम्यान जागतिक नेत्यांसोबत फलदायी चर्चेसाठी उत्सुक आहे.' G-7 शिखर परिषदेत युक्रेन-रशिया युद्ध, इंडो-पॅसिफिकमधील परिस्थिती, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, हवामान यासह महत्त्वाच्या जागतिक आव्हानांवर चर्चा होणार आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी परिषदेत सहभागी होणाऱ्या प्रमुख नेत्यांची स्वतंत्रपणे भेट घेणार आहेत.
5 / 7
या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि इतर अनेक प्रमुख नेते सहभागी होत आहेत.
6 / 7
याशिवाय पंतप्रधान मोदी परिषदेत सहभागी होणाऱ्या प्रमुख नेत्यांची स्वतंत्रपणे भेट घेणार आहेत. जर्मनी दौऱ्यात पंतप्रधान मोदी भारतीय समुदायातील लोकांशीही संवाद साधणार आहेत.
7 / 7
या परदेश दौऱ्यात पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिरातीलाही जाणार आहेत. त्यांच्या भेटीपूर्वी, त्यांनी सांगितले की ते 28 जून रोजी यूएईचे माजी अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी आखाती देशाला भेट देतील.