नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजच्याच दिवशी (7 ऑक्टोबर) एका सरकारचा प्रमुख म्हणून वाटचाल सुरु झाली. बरोबर 20 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्यांनी गुजरातचं नेतृत्त्व करण्यास सुरुवात केली होती. तो काळ गुजरातसाठी बराच कठिण होता. त्यावेळी भुजमध्ये झालेल्या भूकंपामुळे गुजरातला मोठा फटका बसला होता. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी गुजरातची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्या दिवशी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या रुपात त्यांनी सत्तेतील नेतृत्व हाती घेतलं ते आजपर्यंत सुरुच आहे. फरक इतकाच झाली की आधी ते गुजरातचं नेतृत्व करत होते. आता ते देशाचं नेतृत्व करत आहेत.
-
-
सर्वात प्रथम गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना नरेंद्र मोदी.
-
-
भुज भूकंप पीडितांची भेट घेताना नरेंद्र मोदी.
-
-
28 जुलै 2008 : तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बॉम्बस्फोट पीडितांची भेट घेताना नरेंद्र मोदी.
-
-
2011 : गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये टू लेअर फ्लायओव्हरचं उद्घाटन केलं.
-
-
2013 : भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले.
-
-
2014 : पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताना नरेंद्र मोदी.
-
-
2018 : इंटरनॅशनल बिजनेस काऊंसिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करताना जगभरातील सीईओ.
-
-
2019 : दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताना नरेंद्र मोदी.