रामटेक येथील महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा प्रचाराच्या मैदानात
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदाने काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता.त्यानंतर गोविंदा प्रचारासाठी नागपुरात दाखल झाला आहे
नागपूर विमानतळावर अभिनेता गोविंदाचं मोठ्या उत्साहात शिवसेना कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलं
नागपुरात राजू पारवे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे स्टार प्रचारक अभिनेता गोविंदा याचा रोड शो आयोजित करण्यात आला होता
या रोड शोमध्ये अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी होते. नागरिकांचा प्रतिसाद बघता राजू पारवे यांचा विजय निश्चित मानला जातोय