राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांची भेट झाली आहे. या भेटीचे फोटो रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आयपीएल फायनल दरम्यान शिनसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, BCCI खजिनदार आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी संजय नाईक आणि अजिंक्य नाईक यांची भेट झाली, असं म्हणत रोहित पवार यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रोहित पवार यांनी आयपीएलच्या ट्रॉफीसोबतचाही फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सच्या अंतिम सामन्यादरम्यानचे लक्षवेधी क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या सामन्यासाठी सर्व मंडळीचा मुंबई ते अहमदाबाद खास विमानाने एकत्र प्रवास केला.
रोहित पवार यांनी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या भेटीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. अहमदाबादमध्ये बीसीसीआयची विशेष बैठक घेण्यात आली. यामध्ये क्रिकेटसंदर्भात सविस्तर चर्चा झाली, असं म्हणत रोहित पवार यांनी हा फोटो शेअर केला.