राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 'शासन आपल्या दारी' या उपक्रमानिमित्त आज पहिल्यांदाच नाशिकमध्ये आहेत.
Ajit Pawar
पुष्पगुच्छ देऊन यावेळी अजित पवार यांचं स्वागत करण्यात आलं. तसंच त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली.
अजित पवार ज्या मार्गाने नाशिक शहरात येणार होते, तिथे ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन कार्यकर्ते उभे होते. माणूस जिवाभावाचा अजितदादा, असा मजकूर असलेले पोस्टर्स घेऊन कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचं स्वागत केलं.
अजित पवार यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर पाहायला मिळाले. यावेळी अजित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली.