केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गुजरातमध्ये आहेत. आज ते विविध ठिकाणी भेटी देणार आहेत.
अहमदाबादच्या जमालपूरमधल्या रथ यात्रेआधी त्यांनी जग्गनाथ मंदिरातील मंगला आरतीत सहभाग घेतला.
अमित शाह आज दोन उद्यानांचं उद्घाटन करणार आहेत. क्रेडाई गार्डनच्या सार्वजनिक पार्कचं देखील अमित शाह उद्घाटन करणार आहेत.
रेल्वे फ्लायओव्हर आणि एका रुग्णालयाचं भूमिपूजन देखील अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. बावला भागातील त्रिमूर्ती हॉस्पिटलचं देखील अमित शाह भूमिपूजन करणार आहेत.
ही रथ यात्रा देशातील दुसरी सर्वात मोठी रथ यात्रा मानली जाते. या रथ यात्रेआधी अमित शाह मंगला आरती केली. त्याचे फोटो अमित शाह यांनी शेअर केलेत.