अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पवारांच्या बारामतीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. पवार कुटुंबातील युवापिढी राजकारणात येताना दिसत आहे. दोन युवा चेहरे राजकारणार येणार असल्याची चर्चा आहे.
अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.अशातच आता अजित पवार यांचे पुत्र जय पवारही राजकारणत येणार असल्याची चर्चा रंगली आहे. कारण बारामतीच्या राजकारणात ते सक्रीय होताना दिसत आहेत.
युगेंद्र पवारांनी शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर आता जय पवारही बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. ते लोकांशी संवाद साधत आहेत.
अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार आज बारामती मतदारसंघाचा दौरा करत आहेत.जय पवार गावभेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. काही दिवसांच्या अंतरानंतर जय पवारांचा हा दुसरा बारामती दौरा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार कामाला लागल्याचं दिसतं आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर जय पवार यांचा हा दौरा महत्वाचा आहे.