भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जात अभिवादन केलं.
धनंजय मुंडे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यादेखील उपस्थित होत्या. यावेळी पुष्प अर्पण करत गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यात आलं.
माझे अप्पा, लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त गोपीनाथगड येथे आदरणीय एकनाथराव खडसे भाऊंसह अभिवादन केलं. यावेळी अॅड. रोहिणी ताई खडसे देखील उपस्थित होत्या. नाथा भाऊंनी स्व.अप्पांसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला, असं म्हणत धनंजय मुंडे यांच्याकडून फोटो शेअर करण्यात आले आहे.
अप्पा... लोकसेवेचे व्रत आणि वसा तुमच्याकडूनच मिळाला आणि तो निभावण्यासाठी सदैव वचनबद्ध राहीन. माझे अप्पा, लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र आदरांजली, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं.
गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त लागलेल्या बॅनरवरचे फोटो पाहिले की मला त्याची एक एक सभा आठवत होती. रात्री झोपताना माझ्या मनात आठवणींचा कल्लोळ निर्माण झाला होता. अप्पांच्या असंख्य आठवणी आज मला स्मरत आहेत, असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.