काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्यरात्री ट्रकने प्रवास केलाय.
काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
चंदीगडमध्ये राहुल गांधी यांनी एका ट्रकने प्रवास केला. यावेळी त्यांनी या ट्रक ड्रायव्हरसोबत वाहतूक व्यावसायाशी संबंधित चर्चा केली.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जनतेचा आवाज ऐकण्याचा जो सिलसिला सुरू केलाय, तो अविरतपणे सुरू आहे, असं प्रियांका गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
राहुल गांधी यांनी चंदीगडमध्ये ट्रकने प्रवास केला. यावेळी ट्रक ड्रायव्हर्ससी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, असं प्रियांका यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.